महाराष्ट्र

डॉ.शीतल आमटेंच्या मृत्यू चे कारण आले समोर…….!

चंद्रपूर दि.३० – महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूचे गुढ अद्याप कायम असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जून 2020 मध्येही त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

डाॅ. शीतल आमटे या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या, नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्या औषधोपचार देखील घेत होत्या, पोलीस तपासात या बाबी पुढं आल्याचं पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. 21 नोव्हेंबर 2020 रोजी डाॅ. शीतल यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टकडे प्राणघातक लेथल इंजेक्शनची मागणी केली होती. कुत्र्यांसाठी ही इंजेक्शन लागत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, घटनास्थळावर एका इंजेक्शनचे ॲम्पोल फुटलेल्या अवस्थेत आढळून आलं आहे, तसेच वापरलेली सिरींजही आढळली आहे. मात्र कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही, असंही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे.

शवविच्छेदन अहवालानुसार डाॅ. शीतल आमटेंचा मृत्यू श्वास रोखल्यामुळे झाला असल्याचंही पोलीस अधीक्षक साळवे यांनी स्पष्ट केलं आहे, तसेच त्यांच्या उजव्या हातावर इंटरावेनस इंजेक्शनचे व्रण होते. तपासात घातपात झाल्याबाबतचा कोणताही सकृतदर्शनी पुरावा आढळून आला नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close