राजकीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर राज ठाकरेंचे बॅनर……..! आठवण करून दिली……!

मुंबई दि.1 – कोरोनाच्या काळातील वीजबिलाचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर वीजबिलाच्या प्रश्नावरून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवास्थानासमोर बॅनर लावत सरकारवर निशाणा साधला आहे.

          “मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा, ऊर्जा मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं.?” अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलं आहे.

बॅनरमध्ये मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. मनसेने नव्या वर्षाच्या सुरूवातीला ठाकरे सरकारला वीजबिलाच्या मुद्याची आठवण करून दिली आहे. विरोधी पक्षानेही हिवाळी अधिवेशनात सरकारवर वीजबिलावरून टीका केली होती.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close