आरोग्य व शिक्षण
समाजोपयोगी उपक्रम काळाची गरज – सरपंच दादाराव काळे
नेकनूरचे पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर
नेकनूर दि. 2 – वाढदिवस म्हटलं की पैशाचा अपव्यय असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे. अशा काळात नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया यासारखे समाजोपयोगी उपक्रम काळाची गरज बनली आहे. याचा गोरगरिबांना लाभ होतो, त्यासाठी आणखी अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, असे मत सरपंच दादाराव काळे यांनी व्यक्त केले.पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त नेकनूर (ता.बीड) येथील शासकीय रूग्णालयात आयोजित नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी (दि.1) उद्घाटन झाले. याप्रसंगी दादाराव काळे हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यकांत गीते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भारत काळे, सरपंच दादाराव काळे हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुर्यकांत गिते म्हणाले, नेकनूरच्या रुग्णालयात रक्तदान, सर्वरोग निदान शिबिर, स्त्रियांच्या आजारावरील शिबिर अशी शिबिरे यापूर्वी आयोजित करण्यात आली होते. परंतू नेत्र तपासणीसारखं शिबिर गेल्या 2 वर्षांपासून पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येत आहे. या शिबिराची दखल घेऊन यापुढे येथील रूग्णालयात देखील नेत्र तपासणी सुरु करण्यात येत आहे अशी ग्वाही दिली.
तर जिल्हा परिषद सदस्य भारत काळे म्हणाले, वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्च न करता पत्रकार अशोक शिंदे यांच्या मित्र परिवाराने नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेसारखा आदर्श असा उपक्रम राबविला आहे असे सांगून या उपक्रमाबद्दल पत्रकार अशोक शिंदे मित्र परिवाराचे कौतूक केले. यावेळी सफेपूरचे सरपंच श्रीराम घोडके, ग्रामपंचायत सदस्य सतीश मुळे, चक्रधर शिंदे, फुलचंद काळे, राकेश शिंदे, गोरख काळे, जितेंद्र शिंदे, हमेद शेख, रवींद्र काळे, रामनाथ घोडके, सुभाष शिंदे, बिभीषण नन्नवरे, गणेश शिंदे, ग्रा.पं.सदस्य तुळजीराम शिंदे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तुळजीराम शिंदे यांनी केले. तर पत्रकार अशोक शिंदे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दोनशे रूग्णांची केली तपासणी, 22 रूग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया
शिबिरात दोनशेहून अधिक रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून 22 रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत. नेत्र तपासणी शिबिरात डॉ.सिद्दीकी यांच्यासह टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल त्यांचेही पत्रकार अशोक शिंदे मित्र परिवाराने आभार मानले आहेत.
नेत्र तपासणी शिबीर हा आदर्श उपक्रम : भारत काळे
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता पत्रकार अशोक शिंदे यांच्या मित्र परिवाराने नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेसारखा आदर्श उपक्रम राबविला आहे , असे जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनी सांगून या उपक्रमाबद्दल पत्रकार अशोक शिंदे मित्र परिवाराचे कौतूक केले.