क्राइम
ग्रामपंचायत कामाची तक्रार दिल्यावरून तरुणास गज व काठीने मारून हात केला फ्रॅक्चर……! केज तालुक्यातील घटना…..!
डी डी बनसोडे
January 2, 2021
केज दि.२ – शेतात स्कुटीवर निघालेल्या तरुणास ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल तक्रार का केलीस असे म्हणत लोखंडी गज व काठीने मारहाण करीत हात फॅक्चर केल्याची घटना बेलगाव ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रताप दातार हे ३० डिसेंबर २०२० रोजी सकाळी १०.१५ वाजता शेतात स्कुटीवरून जात असताना पांडुरंग चौरे, बालाजी चौरे, दत्तात्रय चौरे, प्रताप घुले यांनी दातार यास अडवून तू आम्ही ग्रामपंचायतीच्या केलेल्या कामाबद्दल तक्रार का केलीस अशी कुरापत काढून शिवीगाळ करीत लोखंडी गजाने व काठीने डाव्या हातावर मारून हात फॅक्चर केला. त्यांनी जाताना हातातील सोन्याच्या प्रत्येकी एक तोळ्याच्या दोन अंगठ्या काढून नेल्या. अशी फिर्याद प्रताप दातार यांनी दिल्यावरून पांडुरंग चौरे, बालाजी चौरे, नरसिंग चौरे, दत्तात्रय चौरे, प्रताप घुले या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहे.
दरम्यान, त्याच दिवशी पांडुरंग रघुनाथ चौरे ( वय ४० ) यांना प्रताप दातार याने कानसुलाला पिस्तुल लावून तुझा भाऊ कुठे आहे सांग असे म्हणाला. तर त्याचे वडील नरसिंग दातार यांनी चाकूने डाव्या हाताचे पोठरीवर वार करून जखमी केले. त्यांचा चुलत भाऊ सोडविण्यासाठी आला असता त्याला इतर दोन अनोळखी इसमांनी काठीने मारहाण केली. तर लाथाबुक्क्याने मारहान करून मुकामार दिला. जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. अशी फिर्याद दिल्यावरून दातार पितापुत्रासह इतर दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल आहे.