आता “या” वयाखालील तरुणांनी धूम्रपान केले तर होणार कारवाई……!
नवी दिल्ली दि.३ – देशात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत केंद्र सरकार मोठा कायदा करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने या नव्या कायद्याचा मसुदासुद्धा तयार केला आहे. हा कायदा अमलात आल्यानंतर आता तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठीचे वय 18 वरुन 21 वर्षे होणार आहे. तसेच नव्या कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थांची विक्री किंवा पुरवठा करताना आढळल्यास त्याला दंडात्मक कारवाईलादेखील सामोरे जावे लागू शकते. तरुणांमध्ये धूम्रपानाचे वाढत असेलेले प्रमाणही या नव्या कायद्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. यानंतर 18 वर्षांखालील युवकांनी जर धूम्रुपान केले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
केंद्र सरकारने सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन (व्यापार, उत्पादन, पुरवठा, वितरण, जाहिरात आणि नियमन) संशोधन कायदा 2020 या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या नव्या कायद्यात सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा व्यापार करण्यासाठीचे वय 18 वरुन 21 वर्षे करण्यात येणार आहे.