क्राइम

केज तालुक्यात २२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार, एकावर बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा

केज दि.३ –  एका २२ वर्षीय महिलेचा पती पिकाला पाणी देण्यासाठी गेल्याची संधी साधत एकाने महिलेच्या घरात घुसून तिचे तोंड दाबून व जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना केज तालुक्यात २८ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. रविवारी रात्री पीडित महिलेच्या तक्रारीवरून एक जणांविरुद्ध केज पोलिसात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
         केज तालुक्यातील २२ वर्षीय पीडित महिलेचा पती हा २८ डिसेंबर रोजी रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. घरी पीडित महिला ही एकटीच झोपली होती. हीच संधी साधून बाळू वैजनाथ घुले ( रा. डोणगाव ता. केज ) हा रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी गेला. त्याने दाराची कडी वाजविली, त्यामुळे तिने तिचा पती शेतातून आला असावा असे समजून दार उघडले. लगेच बाळू घुले घरात घुसून तिचे तोंड दाबून तू मला आवडतेस असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला. जिवाच्या भीतीपोटी पीडित महिलेने घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर रविवारी पतीला या प्रकाराची माहिती दिल्यानंतर दोघांनी पोलीस ठाणे गाठले. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बाळू वैजनाथ घुले याच्याविरुध्द केज पोलिसात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close