जगात जर्मनी, भारतात परभणी पुन्हा एकदा सिद्ध…….! कोरोना लसीला परवानगी देणारे सुपुत्र परभणीचे…….!
परभणी दि.4 – परभणीचे भुमिपुत्र डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयचे संचालक असून त्यांनी देशातील कोरोनावरील दोन लशींना परवानगी दिली आहे.त्यामुळे केवळ परभणी साठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे.
डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांचा जन्म परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी या गावात झाला. शालेय शिक्षण बोरी येथील जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण करून दहावीपर्यंतचं शिक्षण बोरी येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी नांदेडला गेले. नागपूर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमधून फार्मसीची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातून पीएचडी पुर्ण केलं आहे. त्यानंतर युपीएससी परिक्षा उत्तीर्ण करून त्यांनी डिसीजीआयच्या संचालकपदी ते विराजमान झाले. दरम्यान काल त्यांनी दिल्ली इथे पत्रकार परिषद घेऊन कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनला परवानगी दिली आहे.