#Corona
महाराष्ट्रातील “या” चार जिल्ह्यात नव्या कोरोनाचे 8 रुग्ण……!

मुंबई दि.४ – ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हायरसमुुळे चिंता वाढत चालली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
लक्षणे आढळून आलेल्यांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तर कोरोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर 38 लोकांना संसर्ग झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली आहे.