Challenge

नेत्रहीन असूनही परभणी च्या मुलीने केले कळसुबाई शिखर सर……!

पुन्हा एकदा जगात जर्मनी, भारतात परभणी.......!

परभणी दि.६ – जिद्द, चिकाटी अन आवड असेल तर जगात कुठलीच गोष्ट अश्यक्य नाही. जिथे धडधाकट व्यक्ती परिस्थितीला दोष देत बसतात तिथे कांही दिव्यांग व्यक्ती विक्रम करतात. आणि असाच एक विक्रम एका दिव्यांग मुलीने करून दाखवला आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि चढण्यासाठी कठीण मानलं जाणार कळसूबाई शिखर सर करत लता पांचाळ या दिव्यांग मुलीने एक आदर्श निर्माण केला आहे. पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील उध्दवराव आणि अरुणाबाई यांची मुलगी लता ही युवती नेत्रहीन आहे.

दरवर्षी शिवार्जुन प्रतिष्ठानकडून दरवर्षी दिव्यांग युवक-युवतींना कळसूबाई शिखर सर करण्याची मोहिम आखून प्रोत्साहित केलं जातं. यामध्ये लतानेही भाग घेतला होता.लताने तिच्या काही मैंत्रिणींच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, कळसूबाई माता की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत चढाईला सुरूवात केली. शेवटी येणाऱ्या चार लोखंडी शिड्या लताने मोठ्या जिद्दीने पार केल्या आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला लताने हे शिखर सर केलं.

दरम्यान, नववर्षाच्या पहाटे सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असलेल्या कळसूबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तसेच उगवत्या सूर्याला नमस्कार करुन सकाळी 10 वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यास सुरुवात केली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close