केज शहरातील फुले नगर भागातील रामधन डापकर यांच्याकडून आरोपी सुग्रीव शिवाजी बेडसकर ( रा. अहिल्यादेवी नगर, केज ) याने हात उसणे पैसे घेतले. ते उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी डापकर यांनी त्यांचा मुलगा अमित याला पाठविले. ६ जानेवारी रोजी दुपारी २.३८ वाजेच्या सुमारास अमित हा सुग्रीव बेडसकर याच्याकडे त्याच्या पाण्याच्या टाकीजवळील शिवम फेब्रिकेशन दुकानावर आला. त्याने पैसे मागितले असता सुग्रीव याने त्याला शिवीगाळ करीत हातातील लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरवात केली. त्याने अमित डापकर याच्या डोक्यात रॉड मारून डोके फोडले. परत पैसे मागितले, तर जीवे मारून टाकीन अशी धमकीही दिली. अमित रामधन डापकर या तरुणाच्या फिर्यादीवरून फेब्रिकेशन चालक सुग्रीव बेडसकर याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे ह्या पुढील तपास करत आहेत.