क्राइम
केज शहरात तलाठयासह सहाय्यक एसीबी च्या जाळ्यात
केज दि.९ – पाझर तलावासाठी संपादित जमिनीचे क्षेत्र सातबारावरून कमी न दाखवण्यासाठी १ लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यासह सहाय्यकाला ‛एसीबी’च्या पथकाने येथील तहसीलच्या आवारातील टाकळी सज्जाच्या कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चतुर्भुज केले.
दयानंद शेटे तलाठ्याचे तर सचिन घुले असे पकडलेल्या सहाय्यकाचे नाव आहे. तक्रारदाराकडून पाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी न दाखविण्यासाठी १ लाख रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सहाय्यकाकडून ५० हजार रुपये स्वीकारताना ‛एसीबी’च्या पथकाने चतुर्भुज केले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.