आदर्श गावात साड्यांचे वाटप….आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल……!
अहमदनगर दि.१५ – आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचं उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आलाय. राळेगणमध्ये मतदारांना साड्या वाटप करताना दोघांना पकडण्यात आलंय. सुरेश दगडू पठारे आणि किसन मारुती पठारे अशी वाटप करणााऱ्याची नावे आहेत. ते मतदारांना साड्या वाटत असताना भरारी पथकाने ही कारवाई केली. पथकाने 10 लाख रुपयांची इनोव्हा कार आणि 27 हजार 200 रुपयांच्या 136 साड्या जप्त केल्या. पथकाने काही महिलांसह 4 जणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झालीय. अण्णा आणि पवारांना बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यात अपयश आल्याने या दोघांच्याही वर्चस्वासाठी हा धक्का मानला जात आहे.