लढणाऱ्या महिला कमजोर नाहीत.…….! पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य……!
मुंबई दि.१५ – प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका. राष्ट्रीय स्तरावर फक्त दोन टक्के महिला राजकारणात आहेत. एकीकडे जागतिक पातळीवरील राजकारणात कित्येक देशात महिलांना 52 टक्के आरक्षण दिलं गेलं. पण आपल्याकडे अजून या गोष्टीवर संपूर्णपणे विचार झालेला नाही, तो व्हायला हवा, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या.भविष्यात अनेक गोष्टींसाठी महिलांना सामना करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश करावा. अधिकारासाठी लढणाऱ्या महिला खूप आहेत, पण ज्यांच्या हातात शक्ती आहे. अशा महिला खरंच लढत आहेत का? हा एक प्रश्नच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आर्थिक व संरक्षण विभागाच्या महत्त्वपूर्ण मंत्रिपदाचे सूत्र महिलांच्या हातात दिले आहे. तसेच 6 महिलांच्या खांद्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिली असून त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. या देशाचे लोकसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री, मंत्री अशा विविध पदांवरांची जवाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.