#Social

साधेपणाच्या आड पद आणि प्रतिष्ठेचा अडथळा येत नाही……! जेंव्हा आयुक्त खुद्द बाजाराच्या पिशव्या खांद्यावर घेऊन चालतात……!

औरंगाबाद दि.१७ – समाधान नेमके पद, पैसा अन प्रतिष्ठेत आहे की पाय जमिनीवर ठेवण्यात आहे हे समजले तर जीवन सुखकर होतं. आपण कुठल्या पदावर आहोत यापेक्षा आपण कोण आहोत हे लक्षात ठेवले तर लहान लहान गोष्ठीतही आनंद मिळतो. आणि असाच कांहीसा साधेपणाचा प्रकार समोर आला आहे. यातूनच सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत अन त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाले आहेत.

या फोटोत केंद्रेकर आठवडी बाजारात जाऊन स्वतः बाजार करताना दिसत आहेत. इतकंच नाही जर खरेदी केल्यानंतर पिशवी खांद्यावर घेऊन ते निघाले.आठवडी बाजारात पत्नीसोबत बाजार करतानाचे त्यांचे फोटो समोर आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील बाजारातील हे फोटो आहे.

सुनील केंद्रेकर हे औरंगाबादचे विभागीय आयुक्त आहेत. शेतकरी कुटुंबातील केंद्रेकर हे नेहमी आपल्या कडक शिस्तीच्या आणि सामान्यांसाठी निर्णय घेणारे अधिकारी म्हणून परिचित आहेत. दरम्यान मागच्या कांही दिवसांपूर्वी ते बीडचे जिल्हाधिकारी असताना बीडकरांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close