राजकीय
केज तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महिलाराज, तर 494 मतदारांची नोटाला पसंती…..!
केज दि.१८ – केज तालुक्यातील 23 ग्रामपंचायती पैकी 19 ग्रामपंचायती चे निकाल आज जाहीर झाले. तर 4 ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध निघाल्या आहेत. कुणाच्या ताब्यात किती ग्रामपंचायती आल्या? यावरून श्रेयवाद सुरू झाला आहे. कोण कोणत्या पक्षाचे ? कोण कुणाचे ? हे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल मात्र यामध्ये 158 उमेदवार निवडून आले असून त्यामध्ये 80 पेक्षा जास्त म्हणजेच अर्ध्याच्यावर महिला निवडून आल्या असून या निवडणुकीत महिलाराज समोर आले आहे. तर 494 मतदारांनी नोटा चे बटन दाबून उमेदवारा वरील रोष व्यक्त केला आहे.
निवडून आलेल्या महिलांमध्ये अश्विनी रामेश्वर वायबसे, आशाबाई हनुमंत केदार द्रोपदी विठ्ठल केदार, सोजरबाई नवनाथ केदार, रुक्मिण अंकुश जाधव, सुनिता आत्माराम बसवर, अनिता शशिधर निर्मळ, सुक्षाला सदाशिव जोगदंड, द्रोना शिवाजी काळे, कालींदा बाई अंकुश गोडसे, सत्यभामा सुभाष शिर्के, आयोध्या निरंजन बोबडे, अरुणा बाबासाहेब बोबडे, शांताबाई महादेव गुळवे, भागीरथाबाई देविदास तोगे, वैशाली कल्याण घोळवे, अपर्णा प्रवीणचंद्र पवार, वंदना वसंत कदम, अनिता प्रशांत जाधवर, किसनाबाई वैजनाथ जाधवर, अनिता महादेव जाधवर, जनाबाई विजय कुमार चौधरी, विजया विष्णू दीक्षित, छाया बाळासाहेब चौधरी, सुजाता नवनाथ चौधरी, सिंधुबाई नीलकंठ कोकाटे, वैशाली बाबुराव हावळे, कांताबाई सुभाष इंगोले, अश्विनी श्रीनिवास वाघ, सुमन वसंत आघाव, नंदूबाई रमेश कोरडे, महानंदा दत्ता गीते, मनीषा मारुती तेरवे, सविता अश्रुबा वरपे, अर्पिता अमोल दराडे, शिल्पा लक्ष्मण दराडे, देवई सर्जेराव दराडे, अनिता गोविंद दराडे, सुक्षला नवनाथ गीते, निलाबाई लिंबा मुजमुले, मीरा बाजीराव गीते, सुमेधा मंगेश गीते, सीमा विकास जाधव, शेख शाहिस्ता अमीर, सविता दत्तात्रय निर्मळ, अश्विनी धनराज पवार, कविता सहदेव घोरपडे, लोचनाबाई साहेबा वाघमारे, सुवर्णमाला दत्तात्रय सावंत, मालन वसंत घाडगे, छाया बाळासाहेब गायकवाड, अलका सर्जेराव गायकवाड, शिला लक्ष्मण हजारे, सुनिता विजयसिंह जाधव, विजयमाला बाळासाहेब जाधव, छाया बाळासाहेब चंदनशिव, सुमित्रा सुदाम उगलमुगले, आशाबाई नंदू उगलमुगले, संगीता नानाभाऊ उगलमुगले, द्रोपदी शेषराव चौरे, गयाबाई दिनकर उगलमुगले, वैशाली शहाजी खंडाळे, शाहिदा मोबीन शेख, राधाबाई आतम घाडगे, पार्वती यशवंत धाकतोडे, शारदा सतीश मोराळे, कलावती रामराव गोपाळघरे, किस्किंदा रामराव मोराळे, कावेरी अश्रूबा आंधळे, अनिता अनिल खटावकर, मोहरबाई सुरेश जाधव, मनीषा राहुल जाधव, उर्मिला गौतम जावळे, मीना तात्याराम भारती, जयश्री सुरेश हंगे, सोनाली संपत ढाकणे, सुकेशनी वसंत घाडगे, पार्वती रामकर्ण खाडे, वालाबाई सटवा ढाकणे इत्यादी महिलांचा समावेश आहे.( यामध्ये बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती मधील विजयी महिला उमेवारांचा समावेश माहिती उपलब्ध न झाल्यामुळे आलेला नाही)
दरम्यान एवढ्या महिला निवडून आलेल्या असल्या तरी ग्रामपंचायत कारभारात किती महिलांचा प्रत्यक्ष सहभाग राहील हे पाहणे औत्सुक्याचे राहणार असून महिला केवळ नामधारी अन कारभारी पुरुष असे होऊ तरच महिलाराज म्हणता येईल……! निवडणुकीत एकूण 315 उमेदवार उभे होते त्यापैकी 494 मतदारांना एकही उमेवार पात्र न दिसल्याने त्यांनी नोटा ला पसंती दिली असून ह्याचीही दखल घेणे गरजेचे आहे.