राजकीय

आईच्या विरोधात वडिलांच्या बाजूने 11 वीत शिकणाऱ्या मुलाने पॅनल उभा केला, मात्र मतदारांनी दोघांनाही नाकारले….…!

औरंगाबाद दि. 18 – औरंगाबादमधील एका ग्रामपंचायत निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. आई विरोधात मुलानं वडिलांचं पॅनल उभं केल्यानं निवडणुकीचा निकाल काय लागणार ? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र पिशोरी ग्रामपंचायतीचा निकाल लागला अन दोघांनाही मतदारांनी नाकारत कौटुंबिक वाद घरातच ठेवला.

त्याचे झाले असे, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव आणि जावई हर्षवर्धन जाधव यांनी एकमेकांविरोधात निवडणुक लढवली होती. मात्र पिशोरी ग्रामस्थांनी संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांना नाकारलं असून दोघांचाही पराभव झाला आहे. हर्षवर्धन जाधव यांना 17 पैकी 4 जागा जिंकता आल्या. तर संजना जाधव यांना फक्त 2 जागा मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं 9 जागांवर विजय मिळवला तर उर्वरित जागा अपक्षांना मिळाल्या आहेत.

दरम्यान अकरावीत शिकत असलेला त्यांचा मुलगा आदित्य जाधव याने वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली होती व आई विरोधात रणसिंग फुंकले होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close