व्हायरल

माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचे हास्यास्पद वक्तव्य, पहा भर माणसांत नेमके काय म्हणाले…….!

बीड दि.१८ –  जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांनी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या एका अजब परिस्थितीचा किस्सा लोकांना ऐकवला.जेव्हापासून कोरोना महामारी आली आहे तेव्हापासून पत्नीचं चुंबनही घेतलं नाही, असं फारूक अब्दुला म्हणाले. यावर उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.

सर्वचजण हात मिळवणे तसेच मिठी मारण्याला घाबरत आहेत. मी स्वत:च्या पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही मग मनात असूनही मिठी मारण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचं चमत्कारिक वक्तव्य फारूक अब्दुला यांनी केलं आहे.

दरम्यान, फारूक अब्दुला यांनी यापूर्वी ही अशाप्रकारचे वक्तव्य केली आहेत. त्यामुळे ते नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close