राजकीय

खासदारांची सबसिडी बंद होणार, 8 कोटी रुपये वाचणार……!

नवी दिल्ली दि.१९ – लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना संसदेच्या कँटिनमध्ये सबसिडीच्या दरात मिळणारेे जेवण बंद होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. ओम बिर्ला म्हणाले,”संसद सदस्य आणि इतरांना संसदेच्या कँटिनमधील जेवणावर दिली जाणारी सबसिडी थांबवण्यात आली आहे. संसदेती कँटीन आता इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चालवणार आहे. यापूर्वी ही जबाबदारी उत्तर रेल्वेकडे होती.

दरम्यान लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना नाममात्र दरात जेवण मिळत होते. जेवणाच्या एका थाळीची किंमत 35 रुपये होती. केंद्र सरकारडून सबसिडी दिली जात असल्यामुळे इतक्या कमी रकमेत जेवण दिले जात असे. मात्र, खासदारांच्या जेवणावरील सबसिडी बंद केल्यामुळे केंद्र सरकारचे 8 कोटी रुपये वाचणार आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close