#Social
मराठा आरक्षणावर 25 ला नव्हे तर आजच सुनावणी
मुंबई दि.२० – मराठा आरक्षणावर आजपासून नियमित सुनावणी सुरू होणार असून, या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी 25 जानेवारी ही तारीख आधी निश्चित करण्यात आली होती, मात्र हे प्रकरण आजच (20 जानेवारी) लिस्ट झाल्याची माहिती मिळाली आहे.
मराठा आरक्षणावर बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारची आणि वकिलांची 11 तारखेला दिल्लीत बैठक झाली होती. त्या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला पाहिजे, यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे. मागील सुनावणीत अॅटर्नी जनरलला नोटीस काढण्यात आली होती, असं अशोक चव्हाण म्हणाले होते.