होळ येथील रत्नमाला अशोक गोपाळघरे ( वय ३५ ) या महिलेच्या घरात घुसून वाल्मिक विठ्ठल गोपाळघरे व समाबाई वाल्मिक गोपाळघरे या पती – पत्नीने तू आमच्या वाळूवरील कचरा का जाळला ? असे म्हणत काठीने बेदम मारहाण करीत डोके फोडून जखमी केले. त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. रत्नमाला गोपाळघरे यांच्या फिर्यादीवरून वाल्मिक गोपाळघरे, समाबाई गोपाळघरे या दाम्पत्याच्या विरोधात युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार रामधन डोईफोडे हे पुढील तपास करत आहेत.