राज्य सरकारचा मोठा निर्णय…..! “ह्या” गुन्ह्यातून होणार सुटका…..!
मुंबई दि.२१ – कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता. त्यावेळी राज्यात 188 कलमानुसार राज्यात पोलिसांनी कारवाया केल्या. संचारबंदीवेळी नागरिकांनी एकत्र येणं टाळावं यासाठी शासनाने नागरिकांना बाहेर फिरण्यास तसेच कार्यालये, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
वाहनचालकांसह, नागरिकांवर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येत होती. या कारावायांमध्ये अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले होते. आता राज्य सरकारने हे गुन्हे मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. कोविड-19 च्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट केलं असून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे ज्या नागरिकांवर गुन्हे दाखल झाले होते त्यांना दिलासा मिळणार आहे.