ब्रेकिंग
पुण्याच्या कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ला आग.……..!
पुणे दि.२१ – सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची अग्निशमन दलाने माहिती दिली असून अग्नीशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. गुरुवारी दुपारी दोन वाजता सदरील घटना घडली असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
मात्र जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेटनंबर ३,४ आणि ५ या परिसरात बनवली जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
दरम्यान ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती आहे.