स्टाफ सिलेक्शन च्या माध्यमातून साडेसहा हजार पदांची भरती होणार……! “ही” आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख……!

मुंबई दि.22 – स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020’ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू करण्यात येेेणार आहे. तब्बल 6 हजार 506 जागा भरण्यात येणार आहेत. बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.
यामध्ये एकूण 6 हजार 506 पदांची भरती करण्यात येणार असून गट ब मध्ये सहायक लेखापरीक्षण अधिकारी (असिस्टंट ऑडिट ऑफिसर), सहायक लेखा अधिकारी (असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर), सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट सेक्शन ऑफिसर), सहायक (असिस्टंट), आयकर निरीक्षक निरीक्षक, सहायक सक्तवसुली अधिकारी (असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर), उपनिरीक्षक (सब इंस्पेक्टर), सहायक/ अधीक्षक (असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट), विभागीय लेखापाल (डिविजनल अकाउंटंट), उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर), कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी इत्यादी पदे भरणार आहेत.तर गट क मध्ये लेखा परीक्षक (ऑडिटर), लेखापाल (अकाउंटेंट), कनिष्ठ लेखापाल (ज्युनियर अकाउंटंट), वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, कर सहाय्यक, उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) इत्यादी पदांचा समावेश आहे.
यासाठी कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदासाठी पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी असणे गरजेचे असूनउर्वरित पदे कोणत्याही शाखेतील पदवी धारकांमधून भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 अशी आहे. Tier-I साठी 29 मे ते 7 जून 2021 दरम्यान परीक्षा होणार असून Tier-II ची तारीख नंतर सूचित केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी……. https://bit.ly/3ilEB2a
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://ssc.nic.in