राजकीय
ना.रामदास आठवले यांनी माफी मागावी.….! राष्ट्रवादीची मागणी…….!

मुंबई दि.२५ – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. यावर मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त ‘पब्लिस्टिटी स्टंट’ आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नसल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आठवलेंवर निशाणा साधला आहे.
आझाद मैदानातील आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या रामदास आठवले यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. तसंच, हे कायदे सरकारनं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केले आहेत. मोदी हे शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीत. कायदा सरकारनं केला आहे त्यामुळं मागे घेण्याचा प्रश्न नाही, असंही आठवले म्हणाले होते.