क्राइम

”मी आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे” अशी चिट्ठी लिहून केज तालुक्यात शिक्षकाची आत्महत्या……!

केज दि.२५ – तालुक्यातील आडस येथील एका शिक्षकाने आपल्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार (दि.२५) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्या शिक्षकाने पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी आत्महत्या पूर्वी लिहून ठेवलेल्या खिशातील चिठ्ठी वरून लक्षात आली आहे.
        आडस येथील सोमनाथ महादेव आकुसकर (वय-५०) हे धारूर तालुक्यातील रूईधारूर येथे जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. ते अंबाजोगाई येथे कुटूंबासह राहत होते. सोमवारी सकाळी घरीहून शाळेवर जात असल्याचे सांगून ते आडस येथील आपल्या शेतात गेले. त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील चिंचेच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उशीराने निदर्शनास आली. घटनेची माहिती समजताच पोलीस नाईक अनंत आडगळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close