शहरातील मध्यवर्ती भागातील इरिगेशन ऑफिस च्या पाठीमागे लागून असलेल्या असलेले अरुण धारूरकर यांची बीड रोडवर खानावळ आहे. मंगळवारी दि.२६ रोजी ते व त्यांची पत्नी हे नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून सकाळी 9 वाजता खानावळ उघडण्यास गेले. मात्र दुपारी बारा वाजता त्यांच्या मुलाचे आधारकार्ड आणण्यासाठी सविता धारूरकर ह्या घरी गेल्या असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान त्यांनी घरामध्ये पाहिले असता कपाटात ठेवलेले तीन तोळ्यांचे गंठन, 22 ग्राम चे मिनी गंठन, 8 ग्राम चे झुंबर, 5 ग्राम चे वेल, 3 ग्राम ची ठुशी असे एकंदर 8 तोळे सोने व रोख 10 हजार रुपये कपाटात साडीखाली ठेवलेल्या चवीने लॉकर उघडून घेऊन गेल्याचे निदर्शनास आले. सदरील प्रकरणी सविता अरुण धारूरकर यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मात्र भरदिवसा आणि भरवस्तीत असे प्रकार घडू लागल्याने नागरिक भयभीत झाले असून पोलिसांपुढे मात्र आव्हान उभे राहिले आहे.