सायबर क्राईम करायला उच्चशिक्षित असावेच लागते असे काहीच नाही……! ”हा” आहे फक्त आठवी नापास…….!

लखनऊ दि.30 – ”सावधान” तुम्ही जर फेसबुक, इन्स्टावर सातत्यानं फोटो टाकत असाल तर लखनौमध्ये घडलेली घटना डोळे उघडवणारी आहे. विशेषत: मुली आणि महिलांचे सोशल मीडियावरचे फोटो किती असुरक्षित आहेत याचा अंदाज येऊ शकतो. तुम्ही जर फेसबुक किंवा इतर ठिकाणी फोटो शेअर करत असाल तर त्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी होऊ शकतो हे दाखवणारी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
विनीत मिश्रा नावाचा एक तरूण एका तरूणीला ब्लॅकमेल करत होता. तुझे आक्षेपार्ह फोटो माझ्याकडे आहेत, ते सार्वजनिक होऊ द्यायचे नसतील तर पैशांची सोय कर अशी मागणी करायचा. पीडित मुलीनं लखनौच्या सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली. पोलीसांनी तपास केला आणि विनीतच्या मुसक्या आवळल्या. पण विनीतचा तपास केला असता जे सत्य समोर आलं त्यानं पोलीसही चक्रावले.
दरम्यान विनीत मिश्रा हा आठवी नापास आहे, पण तो मुली आणि महिलांचे फेसबुक हॅक करण्यात तरबेज होता. तो मुलींच्या फेसबुक अकाऊंटवर जायचा, तिथून फोटो वगैरे डाऊनलोड करायचा. त्याची एक लिंक तयार करायचा आणि तिच लिंक तो मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी पाठवायचा. लिंक ओपन होण्यासाठी तो संबंधीत मुलींचा मेल वगैरे मागायचा. त्यातून पुन्हा अकाऊंट हॅक करायचा. असं त्यानं एक दोन नाही तर जवळपास चारशे पेक्षा जास्त मुलींचं अकाऊंट हॅक करून ब्लॅकमेल करायचा.