#Social
ओबीसी आणि भटक्या समाजावर हे सरकार अन्याय करतंय – पडळकर
नागपूर दि.31 – महाज्योती संस्थेला निधी देताना तुमचे हात का थरथरतात?, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केला आहे. महाज्योती संस्थेला 500 कोटी रुपयांचा निधी मिळावा, या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागपुरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.
अजित पवार एका दिवसात सार्थी संस्थेला निधी देतात. मग महाज्योती संस्थेला निधी देताना तुमचे हात थरथरतात का?. या सरकारने जाणीवपूर्वक महाज्योतीला निधी दिला नाही, असं पडळकरांनी म्हटलंय. महाज्योती संस्थेला फडणवीस सरकारने 320 कोटी रुपये दिले होते. पण सध्याच्या राज्य सरकारकडून महाज्योती संस्थेकडे दुर्लक्ष केलं जातंय. ओबीसी आणि भटक्यांवर हे सरकार अन्याय करत आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.