केज दि.१ – एका ४० वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील नारेवाडी येथे सोमवारी ( दि. १ ) दुपारी दोन वाजता उघडकीस आली. विजयकुमार नानाभाऊ उगलमुगले असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
नारेवाडी येथील शेतकरी विजयकुमार नानाभाऊ उगलमुगले ( वय ४० ) या शेतकऱ्याने सोमवारी दुपारी १ वाजेच्या नंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच नांदूरघाट बिटचे जमादार मुकुंद ढाकणे, जमादार एस. बी. राठोड, बी. यु. खांडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. नेकनूर येथील सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणी करण्यात आली. राजू उगलमुगले यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान मागच्या तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि विजय हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.