क्राइम
बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपशावर धाडसी कारवाई, चौघे ताब्यात…..लाखोंचा मुद्देमाल जप्त……!
डी डी बनसोडे
February 2, 2021
बीड दि.2 – पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे व त्यांच्या टीमने आष्टी तालुक्यातील टाकळसिंग गावातील सीना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धाडसी कारवाई करून सुमारे 4745000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना ताब्यात घेतले आहे.
सोमवारी सायंकाळी 5.45 वा. सीना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच पथक प्रमुख विलास हजारे व त्यांच्या पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी सदरील ठिकाणी धाड टाकली. यावेळी बाळु तुकाराम देवकते ( जेसीबी चालक) रा.टाकळसींग ता.आष्टी ,सुभाष बाळासाहेब वाल्हेकर (जेसीबी चालक) रा.देविगव्हाण ता.आष्टी, श्रीराम ज्ञानदेव जगताप ( ट्रॅक्टर चालक) रा.टाकळसिंग ता.आष्टी, गणेश सुनिल श्रीगंधे ( ट्रॅक्टर चालक) रा.हिंगणी ता. आष्टी हे अवैद्य रित्या विनापरवाना वाळू उपसा करुन वाळुची चोरी करुन विक्री करण्याचे उद्देशाने तसेच चोरटी विक्री करण्याचा प्रयत्नात असल्याचे निदर्शनास आले.
सदरील ठिकाणावरून
चार ट्रॅक्टर व तीन ब्रास वाळू किंमती- २४४५०००/- रु व दोन जेसीबी किंमत- २३०००००/- रु.असा एकुण ४७, ४५०००/ – रु चा मुद्देमाल व संबंधित चौघांना ताब्यात घेण्यात आले. तर जेसीबी व ट्रॅक्टर मालक फरार झाले.
पथक प्रमुख विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. कोरडे हे करत आहेत.
दरम्यान मागच्या 15 दिवसांपासून विशेष पथकाने अवैध धंद्या विरोधात धाडसी मोहीम उघडत गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले आहे.