क्राइम
घरात घुसून आईसह मुलीस मारहाण, दागिने हिसकावून केला विनयभंग : केज तालुक्यातील घटना……!
डी डी बनसोडे
February 3, 2021
केज दि.३ – जुन्या कौटुंबिक भांडणातून केज येथे घरात घुसून मायलेकींना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेत विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन पुरुष व दोन महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडक्यात माहिती अशी की, केज व कळंब येथील दोन कुटुंबाचे कौटुंबिक भांडण कळंब न्यायालयात न्याप्रविष्ठ आहे. दि. २ फेब्रुवारी रोजी मंगळवारी दुपारी ४.३० च्या दरम्यान कळंब येथील दोन पुरुष व दोन स्त्रिया यांनी केज मधील फुले नगर येथील घरात पुरूष मंडळी घरी नसताना ओळखीचा गैफायदा घेऊन प्रवेश केला. त्यांच्याशी चौघांनी मारहाण करून गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले व वाईट हेतूने शरीराशी व अंगावरील वस्त्राशी झोंबाझोंबी करून विनयभंग केला. तसेच तिचा पती नंतर घरी आला असता त्याला पण दगडाने मारहाण केली.
महिलेच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला दोन पुरुष व दोन महिला त्यांच्या विरुद्ध विनयभंग, घरात घुसून दागिने हिसकावणे, मारहाण व शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे पुढील तपास करीत आहेत.