महाराष्ट्र
ना. धनंजय मुंडे यांनी दिले स्पष्टीकरण……!
मुंबई दि.3 – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी मुलांना चित्रकूट बंगल्यात गेल्या तीन महिन्यांपासून डांबून ठेवल्याचा आरोप केला असूूून यावर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
करूणा शर्मा यांच्या बाबतीत मी यापूर्वीच खुलासा केला आहे. करूणा शर्मा यांना न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसून माझी निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणं हाच हेतू दिसतोय, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.ही बाब न्यायप्रवीष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो बंधनकारकच असणार आहे. तसेच माझ्यावर करूणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.