आरोग्य व शिक्षण
महिलांसाठी सुरू होणार फिरता दवाखाना…….! काय आहे संकल्पना…..?
मुंबई दि.4 – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईसह राज्यात महिलांसाठी आता फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.फिरत्या दावाखान्याचं उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल असेेेही श्री.टोपे यांनी सांगितले.
महीलांना घरातून रुग्णालयात आणणं आणि त्यांच्या घरी सुरक्षित सोडणं यासाठी या फिरत्या दवाखान्याची सुविधा असणार आहे. ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्याला दोन – दोन फिरते दवाखाने असणार आहेत. ग्रामीण भागासह मुंबईमध्ये या फिरत्या दवाखान्याची अधिक वाढ केली जाणार असून याचा चांगला परिणाम होईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.