राजकीय

केज तालुक्यात अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर महिलाराज……..!

केज दि.४ – तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीपैकी पूर्वी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी सरपंच पद आरक्षित झालेल्या २० ग्रामपंचायती वगळता उर्वरित ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत गुरुवारी ( दि. ४ ) दुपारी १ वाजता काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
     केज येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी दुपारी १ वाजता महसूलचे नायब तहसीलदार लक्ष्मण धस व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी सरपंच पदाची आरक्षण सोडत शर्वरी सचिन गोसावी या ६ वर्षाच्या मुलीच्या हाताने चिठ्या काढून केली.
   यामध्ये अनुसूचित जातीसाठी sc-१८) अनुसुचित जातींच्या महिलांसाठी जिवाचीवाडी, बोबडेवाडी, राजेगाव, सारणी (सांगवी), दरडवाडी, घाटेवाडी, काशीदवाडी,गप्पेवाडी/नामेवाडी, आंधळे तर अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या प्रवर्गासाठी दैठणा, लिंबाचीवाडी, जोला, डोणगाव, पिट्ठीघाट, सावळेश्वर, मुंडेवाडी, शिरपुरा सातेफळ आरक्षण पडले आहे.  (अनुसूचित जमाती ST-२) अनुसूचित जमातीच्या महिला करीता वरपगाव/ कापरेवाडी तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या प्रर्वगासाठी रामेश्वरवाडी/ढाकणवाडी आरक्षित आहेत.  (नागरीकांचा मागास प्रवर्ग OBC -३१) नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिकांसाठी आनेगाव, कोरडेवाडी, सांगवी-सारणी, सारुळ, सुडी, बेलगाव/केळगाव, देवगाव, जाधवजवळा, सोनिजवळा, धरमळा, शिटघाट,/गदळेवाडी, धोत्रा, युसुफवडगाव, केवड, चंदनसावरगाव, आणि जानेगाव चा समावेश आहे.
            तर नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित गावे पुढील प्रमाणे आहेत. कोठी, कानडीबदन, सासुटा, नागझरी, काळेगावघाट, बानेगाव, भालगाव, ढाकेफळ, कासारी, कानडीमाळी, वाघेबाभूळगाव, इस्थळ, कुंबेफळ, माळेवाडी, लाखा ही गावे आहेत.
             सर्वसाधारण महिलांसाठी ३२ पदे आरक्षित आहेत. त्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेली गावे आडस, आनंदगाव (सा.), औरंगपूर, बनकरंजा, बावची, चिंचोली माळी/ सारुकवाडी, दहिफळ वडमावली, धनेगाव, गोटेगाव, होळ, जवळबन, कोल्हेवाडी, लाडेवडगाव, माळेगाव, नाहोली, नायगाव, नारेवाडी, पैठण, साबला, सारणी (आं.), टाकळी, तांबवा, उमरी, उंदरी, नांदूटघाट, डोका, शिंदी, सौंदना, भोपाला, भाटुंबा, आरणगाव आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित नसलेली आवसगाव/ वाकडी, बनसारोळा, बोरगाव (बु.), दिपीडगाव, हादगाव, हनुमंत पिंप्री, कळमअंबा, कौडगाव, केकतसारणी, कोरेगाव, केकणवाडी, लाडेगाव, मांगवडगाव, मस्साजोग, मोटेगाव, पळसखेडा, पाथरा, पिंपळगव्हाण, पिराचीवाडी, सादोळा, सोनेसांगवी, सुकळी, तरनळी, विडा/ गौरवाडी, येवता, बोरीसावरगाव, मुलेगाव, शेलगाव-गांजी, साळेगाव, लहुरी आणि पिसेगाव ही गावे आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close