#Corona
राज्यातील ”हे” मंत्रीही झाले कोरोना बाधित…….!

मुंबई दि.५ – राज्ययाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी स्वत: दिली आहे.अनिल देशमुख यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल, असं अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते.