#Corona
आज बीड जिल्ह्यात कोरोनाचे मीटर डाऊन……!

बीड दि.६ – आज सकाळी जाहीर करण्यात आलेल्या कोरोना अहवालाने जिल्हावासी सुखावले असून 475 अहवालात केवळ 18 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये बीड 10, आष्टी 3, परळी 3 आणि अंबाजोगाई च्या 2 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालात तब्बल 457 अहवाल निगेटिव्ह आले असून जिल्ह्याचा कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे.