राजकीय

अन ते म्हणाले, एका झटक्यात बाटली रिचवली की नाही……?

इंदापूर दि.६ – राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या मिश्कील भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. बऱ्याचदा ते भाषणात असं काही बोलून जातात की, उपस्थितही अवाक् होतात. आता त्यांनी असंच एक वक्तव्य केल्यानं सभेत एकच हशा पिकला. ”हे बघा तुम्ही मला आता पाणी पिताना पाहिलं ना, एका झटक्यात बाटली रिचवली का नाही..? पाण्याची बरं का”, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाल्यानं सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमचं इंदापूर  तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. अजित पवारांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी सरकार, कोरोना, इंदापूर, जीएसटी सारख्या मुद्द्यांवरही भाष्य केलंय. भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..? असा टोला माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांनी यावेळी लगावला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close