ब्रेकिंग
केज येथील लेंडी नदीत प्रेत आढळले
केज दि.6 – केज येथील अल्लाउद्दीन नगरच्या जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीत एक पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे.
दि. ६ फेब्रुवारी रोजी शनिवारी केज येथील भिमनगर लगतच्या स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीच्या पात्रात एक पुरुष जातीचे अंदाजे ४५ वर्ष वयाचे अनोळखी प्रेत तरंगत असल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. शेख युन्नूस चांद व गुलाब गुंड हे दुपारी ४ वा. च्या दरम्यान शेतात गेले असता त्यांना प्रेत आढळून आले. त्यांनी याची माहिती केज पोलीस स्टेशनला देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे तसेच उपविभागीय पोलीस कार्यालयाचे कर्मचारी वैभव राऊत व पप्पू अहंकारे हे सर्वजण घटनास्थळावर हजर झाले आहेत. प्रेत पाण्याच्या बाहेर काढन्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत. घात की अपघात ? पोलीस तपासात निष्पन्न होईल.
