क्रीडा व मनोरंजन
पुरावा म्हणून चक्क कोंबड्या आहेत 25 दिवसांपासून पोलीस कोठडीत……!

हैदराबाद दि.८ – एका गुन्ह्याच्या संदर्भात पोलिसांनी चक्क कोंबड्यांना ताब्यात घेतले आहे. हा अजब प्रकार तेलंगणातील खम्मम तालुक्यात घडला असल्याची माहिती समोर आली आहे.खम्मम तालुक्यातील मिडीगोंडा येथे कोंबड्यांची झुंज लावण्याचा खेळ सुरु होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली आणि तेथील लोकांना अटक केलं. त्याचबरोबर पोलिसांनी पुरावा म्हणून कोंबड्यांनाही ताब्यात घेतलं.
दरम्यान अटक केलेल्या लोकांनी स्वतःची जामिनावर सुटका करुन घेतली. परंतू कोंबड्या अजूनही कोठडीत बंद आहेत. तब्बल 25 दिवस उलटले तरी पोलिसांनी अजूनही या कोंबड्यांची सुटका केलेली नाही. कोंबड्यांची सुटका कधी होणार हा प्रश्न आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता न्यायालयाच्या सुनावणीनंतर त्यांची सुटका होणार असल्याचं समजतं.