क्राइम

परळीत बहीण भावाच्या नात्याला काळिमा……!

परळी दि.८ –  बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. चुलत भावाने दिव्यांग बहिणीवर बळजबरीने अत्याचार केला. ५ फेब्रुवारीची ही घटना असून आरोपी फरार आहे.

             पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रामीण ठाणे हद्दीतील ३० वर्षीय पीडित तरुणी दिव्यांग आहे.५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता ती आपल्या घरी होती. यावेळी तिचा चुलतभाऊ घरात शिरला. त्याने सुरुवातीला तिची छेड काढली व नंतर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर तो पसार झाला. पीडितेने घडला प्रकार कुटुंबाला सांगितला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण ठाणे गाठून फिर्याद दिली. विनयभंग, बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून तपास सहायक निरीक्षक प्रताप नवघरे करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close