#Vaccination
तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील लोकांचे लसीकरण – राजेश टोपे

मुंबई दि.10 – राज्यात सध्या दररोज 40 ते 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत असून आतापर्यंत 5 लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 1 मार्चपासून नोंदणी सुरू होऊ शकते असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 652 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. प्रत्येक आठवडय़ाला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत कोविन पोर्टलवर 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी 4 लाख 68 हजार 293 आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरण झाले आहे. 5 लाख 47 हजार फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी 41 हजार 453 जणांना लस देण्यात आली आहे.