आपला जिल्हा
संभाजी ब्रिगेड प्रणित शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन
बीड दि.११ – नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांवरील शिक्षकांना निधीसह अनुदान मंजूर करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड बीड प्रणीत शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.सोमवारचा दिवस असल्याने आज आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
सन २०१२-१३ च्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांवर सुमारे १५ ते २० हजार शिक्षक कार्यरत आहेत. सदरील शिक्षक हे सुमारे १० ते १५ वर्षांपासून विनावेतन इमानदारीने काम करत आहेत. मात्र आजपर्यंत शासनाने यावर कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. शिक्षकांना न्याय द्यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी श्रीकांत बागलाने, गणेश शिंदे, मनोज कवडे, उमेश पवार, गोवर्धन पवार, सचिन कदम, श्रीमती चौरे ,लांडगे, सावध आदींची उपस्थिती आहे.