#Missing

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता, केज तालुक्यातील घटना…….!

केज दि.12 –  घरातून मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्याची घटना केज तालुक्यात घडली असून पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
                 केज तालुक्यातील एका गावातील दोन सख्ख्या बहिणी या दि.१२ फेब्रुवारी रोजी मॉर्निंग वॉकला जात आहोत; असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. त्या पैकी एकीचे वय २१  तर दुसरीचे १८ वर्ष आहे. त्या लवकर घरी परत न आल्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी नातेवाईक व इतरांकडे चौकशी केली परंतु त्या मिळून आल्या नाहीत. मोठ्या मुलीची उंची ५ फूट ६ इंच असून रंग गोरा, मध्यम बांधा, अंगात पांढऱ्या रंगाचा नाईट ड्रेस व पायात रनिंग शूज आहेत. तर लहान मुलीची उंची ४ फूट ६ इंच, रंग गोरा, मध्यम बांधा, अंगात लाल रंगाचा नाईट ड्रेस व पायात रनिग शूज आहेत. या मुली बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांच्या वडिलांनी केज पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोलीमाळी बिटचे पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत. या दोघी बहिणी कुणाला आढळून आल्या किंवा त्यांच्या बाबत काही माहिती मिळाली तर नजिकच्या पोलीस स्टेशनला किंवा केज पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close