क्राइम

बीड येथे आढळून आलेल्या अर्भक प्रकरणी एका महिलेची चौकशी, डीएनए चाचणी नंतर होणार कारवाई……!

बीड दि.१२ –  येथील जालना रोडवरील वीर हॉस्पिटलच्या वाहनतळानजीकच्या शौचालयात एक मृत अर्भक गुरुवारी (दि.११) सायंकाळी आढळून आले होते.याप्रकरणी शहर पोलिसांनी तपास सुरु केला असून ‘त्या’ अर्भक प्रकरणी एका महिलेचा जवाब नोंदविण्यात आला.यामध्ये तिन्हे कबुली ही दिली असून दोघांच्या डीएनए तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवि सानप यांनी दिली.
शहरातील जालना रोडवर वीर हॉस्पिटल असून गुरुवारी (दि.११) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मेडिकलवर कामाला असणारे ओमप्रकाश शेटे हे वाहन पार्किंगमधील सार्वजिनक शौचालयात गेले. यावेळी त्यांना येथे एक अर्भक दिसले. त्यांनी ही माहिती डॉ.संजय वीर यांना दिल्यानंतर तात्काळ शहर पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली.घटनास्थळी शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप हे पथकासह दाखल होत तपास सुरु केला.यावेळी सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे संशियत महिलेला ताब्यात घेत तिचा जवाब नोंदविला असता तिन्हे अर्भक तिचेच असल्याची कबुली दिली.मात्र त्या अर्भकासह तिची डीएनए तपासणी करण्यात येणार असून यानंतर कारवाई करण्यात येईल अशी माहिती  पोलीस निरीक्षक रवि सानप यांनी दिली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close