क्राइम

12 टन खताची परस्पर विल्हेवाट लावणारा चालक ट्रक सह पकडला, केज पोलिसांची कारवाई……!

केज दि. 16 – एका ट्रक ड्रायव्हरने परस्पर तो चालवीत असलेल्या ट्रक मधील खताचे पोते दुसऱ्या ट्रक मध्ये भरून खत पळविले असल्याचा गुन्हा कोल्हापूर पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. त्याची माहिती केज पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी ट्रकचा पाठलाग करून तो पकडला असून सदरील ट्रकचालक केज तालुक्यातील एकुरका येथील नटराज रामहरी धस हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

               दि.१३ फेब्रुवारी शनिवार रोजी नटराज धस याने गुडाळ येथील ४०० पोती इफको कंपनीचे १२ टन खत गुडाळ येथे पोहोच करण्यासाठी गाडीत भरले. परंतु त्याने हे खत गुडाळ येथे पोहोच न करता रस्ता चुकल्याचा बहाणा करत सदर ट्रक हा सांगली येथे आणला. तेथून त्याने ट्रक मधील माल दुसऱ्या एका आयशर टेम्पो व टाटा ट्रक क्र. (एमएच-०९/ क्यू-५५३७) मध्ये भरला. नंतर तो ट्रक क्र. (एमएच-०४/एफजे-८८७२) ट्रक तेथेच सोडून पोबारा केला. दरम्यान तो खताचा माल भरलेला ट्रक ईच्छित स्थळी पोहोचला नसल्याची माहिती अक्षय जाधव यास ट्रान्सपोर्ट कार्यालया मार्फत मिळाली आणि ड्रायव्हर नटराज धस याचा मोबाईल फोन बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते त्यांचा ट्रक व ड्रायव्हर नटराज धस यांचा शोध घेत सांगली येथे आले. त्यांना ट्रान्सपोर्ट कार्यालया कडून अशी माहिती मिळाली की, त्यांच्या ट्रक मध्ये खत भरून ट्रक रवाना केला परंतु तो ट्रक व त्यातील माल अद्याप पर्यंत इप्सित स्थळी पोहोचला नव्हता. त्यांनी ट्रकचा शोध घेतला असता त्यांचा ट्रक हा सांगली येथे आढळून आला. त्यानंतर त्यांनी तो ट्रक कोल्हापूर येथे आणला ट्रान्सपोर्ट कार्यालयातून मालाच्या बिलटीच्या झेरॉक्स प्रति घेऊन त्यांनी दि.१५ रोजी कोल्हापूर पोलीस स्टेशनला ट्रक ड्रायव्हर नटराज धस याने त्याच्या ताब्यातील ट्रक पळवून नेऊन त्यातील मालाचा अपहार केल्या प्रकरणी कोल्हापूर पोलीस स्टेशनला  अक्षय जाधव यांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक सचिन पांढरे हे त्याचा तपास करीत होते.

दरम्यान गुन्हा दाखल होताच या बाबत केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना याची माहिती मिळाली की, चोरीचे खताची एक ट्रक परिसरता आढळून आल्यास ताब्यात घेण्याची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, सपोउनि कादरी, जिवन करवंदे, गुप्तवार्ता दिलीप गित्ते, बाळासाहेब अहंकारे, महादेव बहिरवाल, थोरात यांनी मस्साजोग जवळ एक संशयित व खताने भरलेली ट्रक असल्याची माहिती मिळताच तिचा पाठलाग करून नाट्यमय रितीने ती मुद्देमालासह ट्रकसह चालक नटराज धस याला ताब्यात घेतले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close