#Corona
कोरोना कर्मचारी परिषदेच्या केज तालूकाध्यक्षपदी सचिन शिंदे
केज दि.१६ – कोरोना योध्दा कर्मचारी यांच्या विविध मागण्या व कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून परिषद स्थापित करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रमोदजी काटे उपाध्यक्ष, श्रीकांत जरांगे यांच्या सूचनेवरून केज तालूका अध्यक्षपदी सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
कोरोना योध्यानी कोवीड 19 सारख्या महामारीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या जीवाची पर्वा न करता शासनाने दिलेल्या सुविधेला रुग्णां पर्यंत पोहचवण्याचे काम केले. कोरोनासारख्या महामारी पासून आपल्या जिल्ह्याला जिंकवले. अशा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात यावे व योग्य तो न्याय द्यावा. अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा नूतन तालुका अध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिला आहे. यावेळी राज ढाकणे, जय जोगदंड, आकाश घाटूळे, शिवराज मूथळे, आशोक गाडे यांनी सचिन शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.