हवामानानुसुर आजाराचा चढ उतार होत आहे – डॉ. लहाने…..!
मुंबई दि.20 – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशातच प्रसिद्ध डाॅ. तात्याराव लहाणे यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट नाही. हवामानानुसार संसर्गजन्य आजाराचा चढ उतार होत आहे, असं डाॅ. तात्याराव लहाणे यांनी सांगितलं आहे.
रुग्णांची संख्या वाढली तरी मृत्यू दर कमी राहील. कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही तर हात धुणे, मास्क लावणे आणि अंतर ठेवणे हाच उपाय आहे. नवीन कुठलंही लक्षण दिसत नाही हा दिलासा आहे. राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन नाही हा जुनाच विषाणू आहे. लॅब आणि डॉक्टरांचा अनुभव यामुळे कोरोना आटोक्यात राहील, असा अंदाजही डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला.
अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे या राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये कमालीची वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे, असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.