#Corona
आज बीड जिल्ह्यात 58 कोरोना रुग्ण, केज शहरातील चौघांचा समावेश

केज दि.20 – राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच आज जाहीर करण्यात आलेल्या 436 कोरोना अहवालात जिल्ह्यात 58 रुग्ण बाधित आढळून आले असून केज शहरातील 4 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाईत 13, आष्ठी 3, बीड 25, माजलगाव 3, परळीत 4,पाटोदा 2, शिरूर 2, धारूर 2 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज शहरातील कानडी रोड भागात 3 तर गणेश नगर भागात 1 रुग्ण आढळून आला आहे.