#Judgement
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा……!
बीड दि.20 – पीडित मुलीच्या आईस खोटे सांगून अल्पवयीन पीडित मुलीला घरी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी एका विधिसंघर्षग्रस्त बालकास पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा बीडच्या विशेष न्यायालयाने सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 28/10/2017 रोजी 11.30 ते 12.00 वा. सुमारास यातील विधीसंघर्षग्रस्त बालकाने बोकडाला औषध लावण्यासाठी तुमच्या मुलीला घेऊन जात आहे असे मुलीच्या आईस सांगून पिडीतेस स्वत:च्या घरी नेवुन घराचा दरवाजा आतून लाऊन तिचेवर अत्याचार केले. सदर घडलेल्या घटनेच्या आधारावर पिडीतेच्या आईने पोलीस ठाणे तलवाडा अंतर्गत गु.र.नं.182/2017 कलम 376(2) (F),363,366 भादंवि सह कलम 5,6 बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक अधिनीयम अन्वये फिर्याद नोंदविली. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. आर. गढवे यांनी करून आरोपीताविरुध्द अंतीम दोषारोप पत्र मा. न्यायालयस सादर केले.
सदर प्रकरणाची सुनावणी मा.विशेष न्यायालय, बीड, एम. व्ही. मोराळे यांच्या न्यायालयात झाली. विधीसंघर्ष ग्रस्त बालकाविरुध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर त्यास मा. न्यायालयाने कलम 376(2)(I), 511 भादंवि व कलम 9 बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध अधिनीयम अंतर्गत दोषी धरून पाच वर्ष सश्रम करावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सदरील प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील श्रीमती मंजुषा दराडे यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज पोह व्ही. डी. बिनवडे व मपोना सी. एस. नागरगोजे यांनी पाहिले.