#Corona

लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये – कौस्तुभ दिवेगावकर

उस्मानाबाद दि.21 – उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि त्यांच्या पत्नीला कोविड चा संसर्ग झाला आहे .कोविडबाबत खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले असून समाजमाध्यमांमध्ये  कोविड  लस घेतली तरी जिल्हाधिकाऱ्यांना कोरोणा लागण झाली अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. त्यातून लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी खुलासा केला आहे .
               मागील काही दिवसांपासून  शासकीय  कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. पण आपल्याबाबतीत तोवर व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे नो मास्क नो एन्ट्री आवश्यक आहे. मी दोन आठवड्यांपूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात . त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने यासाठीच दिल्या आहेत. हे सर्व पाहता आपण सर्व फ्रंट लाईन वर्कर्स जसे की महसूल, आरोग्य, पोलीस यांनी अत्यंत सावध राहावे. कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या.
                 आपल्याला समाधान आहे की उस्मानाबाद जिल्ह्यात मागील सहा महिन्यात ज्या सोयीसुविधा आपण शासकीय रुग्णालयांत निर्माण केल्या त्याचाच लाभ मलाही मिळत आहे.
                       मागील आठवडाभरात आपण कोविड च्या दुसऱ्या लाटे साठी तयार सुरू केली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये आपल्याकडे केवळ ६० ऑक्सिजन बेडस , १८ व्हेंटिलेटर उपलब्ध होते. आज फेब्रुवरी २०२१ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात ११०० ऑक्सीजन सपोर्टेड बेडस् आहेत. १९६ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. इतरही अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. दुसऱ्या लाटेसाठी तयारी करताना अँटीजन किट्स, N95, नवीन ऑक्सीजन सिलेंडर, नवीन २०० ऑक्सीजन लाईन, 2 डी इको व इतर नवी यंत्रसामग्री याबाबत नियोजन केलेले आहे. ९६० सीसीसी बेड्सची सुविधा पूनःस्थापित करण्याचे काम वेगात सुरू आहे.
          दरम्यान लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्तींची चाचणी, विलगीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग ही प्रक्रिया वेगात राबवायची आहे. लोकांनी कोणतेही लक्षण अंगावर काढू नये यासाठी सरकारी खाजगी हॉस्पिटल्स व सर्वांनीच जनजागृती केली पाहिजे. किंबहुना मी लस घेतली आहे त्यामुळे ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही असे मानून दुर्लक्ष केले असते तर माझ्याकडून लोकांना संसर्ग झाला असता. माझ्यासोबत माझी पत्नी प्रियांका बोकील याही कोविड पोजिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबीयांची कोविड तपासणी महत्वाची ठरते. यामुळे नागरिकांना पुनश्च आवाहन की कोणतेही लक्षण अंगावर काढू नये. लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी.
            तसेच काल केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची एसओपी प्राप्त झाली आहे. त्या एसओपी आणि  राज्य शासनाच्या विविध सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपण सर्वजण मागील एक वर्षापासून कोविडच्या साथीचा सामना करत आहोत. इतिहासाला नोंद घ्यावी लागेल इतके मोठे  काम महाराष्ट्रातील यंत्रणांनी केले आहे, पुढेही करत राहू. अशी आशा कौस्तुभ दिवेगावकर
यांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close